#HappyBirthday मुलतानचा 'सुलतान'! वाचा सेहवागचे काही खास विक्रम.

Indian News

Indian News

Author 2019-10-20 14:21:00

img

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही सेहवागच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. वयाच्या या टप्प्यावरही सेहवाग सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्याच्या चाहत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. जाणून घेऊनच्या त्याच्या काही खास विक्रमांची माहिती…

कसोटी क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक सरासरीने मोठी खेळी साकरण्याचा अनोखा विक्रम विरुच्या नावावर आहे. 2008 मध्ये चेन्नई कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विरुने 104.93 च्या सरासरीने 319 धावा चोपल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल तीन वेळा 290 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम विरुच्या खात्यावर जमा आहे. ब्रॅडमन यांनी 334, 334 आणि नाबाद 299 धावा चोपल्या होत्या, तर विरुने 319, 309 आमि 293 धावा करत त्यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

सर्वाधिक कमी चेंडूत त्रिशतक ठोकण्याचा विक्रमही विरुच्या नावावर आहे. याशिवाय कसोटीत त्रितशक आणि वन डेमध्ये द्विशतक करणारा विरु जगातील पहिला फलंदाज आहे. विरुसह वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल यानेही अशी कामगिरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद 10 द्विशतकांमध्ये विरुच्या पाच खेळींचा समावेश होतो. विरुने कसोटीत सलग 11 अशी शतकं झळकावली आहेत ज्यात त्याने 150 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या खेळाडूत विरुचा पहिला नंबर लागतो. विरुने आफ्रिकेविरुद्ध एकाच दिवशी 284 धावा चोपल्या होत्या.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD