#INDvSA : रोहितचे अर्धशतक, भारत ९१/०

Pudhari

Pudhari

Author 2019-10-02 14:10:00

img

विशाखापट्टणम : पुढारी ऑनलाईन

कसोटी सामन्यात प्रथमच सलामीला खेळणा-या रोहित शर्माने द. आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक झळकावले आहे. २९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एस. मुथूस्वामीला चौकार ठोकून त्याने अर्धशतक पूर्ण केले.

चौकार ठोकून खाते उघडले...

चाहत्यांमध्ये हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने एकदिवसीय आणि टी-२० च्या शैलीतच आपल्या डावाला सुरुवात केली. त्याने दुसर्‍या षटकाच्या दुस-या चेंडूवर कागिसो रबाडाला बॅवर्ड पॉइंटच्या दिशेने चौकार ठोकत धावांचे खाते उघडले. सामन्यात रोहितचा हा दुसरा चेंडू होता. यापूर्वी मयांक अग्रवालने फिलँडरला चौकारत ठोकून भारताचे खाते उघडले. उपहारापूर्वी भारताची धावसंख्या ३० षटकात बिनबाद ९१ अशी आहे. मयांक अग्रवाल १ षटकार ६ चौकारांच्या जोरावर ९६ चेंडूत ३९ धावा केल्या आहेत.

सलामीवीर म्हणून पहिले अर्धशतक

२९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रोहितने चौकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले. सलामीवीर म्हणून पहिले तर, कसोटी कारकीर्दीतील त्याचे एकून ११ वे अर्धशतक आहे. उपहारापर्यंत रोहितने ८४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या.

रोहितवर मोठी जबाबदारी

केएल राहुलच्या खराब कामगिरीनंतर रोहितला कसोटीत सलामीची संधी मिळाली. या सामन्यापूर्वी रोहित कसोटीत मधल्या फळीत खेळ असे. रोहितने (या सामन्यापूर्वी) आतापर्यंत २७ कसोटी सामन्यात ३९.६२ च्या सरासरीने १५८५ धावा केल्या आहेत, तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १० हजारहून अधिक धावा आहेत.

तत्पूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर टीम इंडियाचे सलामीवीर मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा मैदानावर उतरले. कसोटीत प्रथमच सलामीला खेळणा-या रोहित शर्मावर भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मयंकसमवेत क्रीजवर उतरलेला रोहित लयीत दिसत आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका (गांधी-मंडेला ट्रॉफी) खेळणार आहे. ही मालिकादेखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग आहे. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळली गेली होती. ३ सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. तर, धर्मशाळे (हिमाचल प्रदेश) येथे टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

दक्षिण आफ्रिकेचा संघ आशिया खंडातील सलग आठव्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकू शकला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील हा भारताचा तिसरा सामना आहे. यापूर्वी भारताने दोन कसोटीत सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे.

भारतीय संघ :

हित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमाच विहारी, रिद्धिमान साहा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

दक्षिण आफ्रिका संघ :

ए मार्क्राम, डी एल्गर, टी डी ब्रूयन, टी बावुमा, एफ डू प्लेसिस, क्यू डी कॉक, व्ही फिलँडर, एस मुथुसामी, के महाराज, डी पायड, के रबाडा

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN