#INDvsSA : दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन

Pudhari

Pudhari

Author 2019-10-13 12:15:33

img

पुणे : पुढारी ऑनलाईन

पुणे येथील एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली पकड घट्ट केली आहे. चौथ्या दिवशीचा खेळ सुरू होण्याआधी भारताने द. आफ्रिकेला फॉलोऑन दिला असून त्यांच्या सलमीवीरांनी दुस-या डावास सुरुवात केली आहे. डीन एल्गार आणि आयडन मार्करम सलामीला फलंदाजीस उतरले आहेत. भारताकडे आता ३२६ धावांची आघाडी आहे. विराट कोहलीने आज (रविवार) सकाळी घेत फॉलोऑन देण्याचा निर्णय द. आफ्रिकेच्या संघाला पुन्हा फलंदाजी करण्याची संधी दिली आहे.

शनिवारी भारतीय फलंदाजांनंतर सामन्याच्या तिसर्‍या दिवशी गोलंदाजांनी कमाल दाखवत दक्षिण आफ्रिकेला केवळ २७५ धावांत गारद केले. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर आता भारतीय संघाकडे ३२६ धावांची आघाडी आहे.

वेर्नान फिलँडर आणि केशव महाराज यांची शतकी भगिदारी

दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांना लवकर बाद करूनही वेर्नान फिलँडर आणि केशव महाराज यांनी नवव्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीमुळे आफ्रिकेने २७५ धावांपर्यंत मजल मारली.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN