#MandirwahiBanega: रामजन्मभूमीच्या निकालानंतर सेहवागचा मास्टर स्ट्रोक

Maharashtradesha

Maharashtradesha

Author 2019-11-09 15:54:40

img

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद खटला प्रकरणी आज अंतिम निर्णयाचे वाचन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगाई यांचे खंडपीठ सकाळी साडेदहा वाजल्यापासून या खटल्याल्याच्या निर्णयाचे वाचन करीत होते.

सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येच्या प्रलंबित खटल्यावर निकाल दिला आहे. हा निकाल पूर्णपणे रामलल्लाच्या बाजूने लागला आहे. तर मुस्लीमांना ही अयोध्यात 5 एकर स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. त्यामुळे मुस्लीम पक्षकारांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे.

या निर्णयानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा माजी स्टार क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रभू रामचंद्राचा फोटो ट्वीट करत जय जय श्रीराम असं म्हटलं आहे.

दरम्यान,संपूर्ण 2.77 एकर जमीन राम लल्लाची, वादग्रस्त जागेची वाटणी होणार नाही असेही सर्वोच्च न्यायलयात स्पष्ट झाले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन देणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्वागत करण्यात आले आहे.

Loading...

मशीद रिकाम्या जागी बांधली नव्हती. मशिदीखाली मोठी रचना होती असं कोर्टाने मान्य केले आहे. शिया वक्फ बोर्डाचा दावा एकमताने फेटाळला. गोगोई म्हणाले, ‘आम्ही १९४६ च्या फैजाबाद कोर्टाच्या निकालाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची सिंगल लीव पिटीशन फेटाळत आहोत’ असं कोर्टाने म्हटलं आहे.

वादग्रस्त जागा हिंदुंना, मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. वादग्रस्त जागेत १८५६-५७ पर्यंत याठिकाणी नमाज पढण्यात आला नव्हता. त्यापूर्वी याठिकाणी हिंदूकडून पूजा केली जात होती. या जागेवर दावा सांगणारा कोणताही पुरावा सुन्नी वक्फ बोर्डाला सादर करता आला नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.मंदिर तोडून मशीद बनवण्यात आली याचा कोणताही पुरावा नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.

Loading...

अयोध्येत मंदिर निर्माणासाठी नियम बनवा, केंद्राला आदेश कोर्टाने देण्यात आले आहेत. मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार असून ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारा असं कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करत असल्याचे सुन्नी वक्फ बोर्डा ने म्हटलं आहे. तसेच बोर्डाकडून निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

Loading...

प्रभू रामाचा जन्म याच ठिकाणी झाला होता, अशी हिंदूची श्रद्धा आहे.त्याप्रमाणे रामाचा जन्म अयोध्येत झाला याबाबत कोणताही वाद नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. श्रद्धा ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असं न्यायालायनं म्हटलं आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD