'टीम इंडिया'चा फलंदाज बांधणार अभिनेत्रीशी लग्नगाठ

Loksatta

Loksatta

Author 2019-10-10 19:42:42

img

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. त्यामुळे भारतीय संघाची चर्चा रंगली आहे. पण आता भारतीय संघात नसूनही एक खेळाडू जोरदार चर्चेत आहे. तो क्रिकेटपटू म्हणजे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे. मनीष पांडे त्याच्या आयुष्यातील एक नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने त्याच्या आयुष्याचा जोडीदार शोधला आहे. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीशी तो लग्नगाठ बांधणार आहे.

img

३० वर्षाचा मनीष पांडे लवकरच दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत विवाह बंधनात अडकणार आहे.  दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रीता शेट्टी हिच्याशी तो विवाहबद्ध होणार आहे. त्याच्या विवाहाचा मुहूर्तदेखील ठरला असल्याचे बोलले जात आहे. मनीष पांडे आधी विंडिज दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी २० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करत होता. आता मनीष पांडे सध्या विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे या स्पर्धेनंतर तो विवाहबंधनात अडकणार आहे असे सांगितले जात आहे.

img

एका प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, IPL मधील शतकवीर मनीष पांडे २ डिसेंबर २०१९ ला लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. मुंबईमध्ये त्याचा विवाह संपन्न होणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रीता शेट्टी हिच्याशी तो विवाहबद्ध होणार आहे. अश्रीता शेट्टी आणि मनीष पांडे हे दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशीपमध्ये होते, अशी चर्चा होती. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून ते लवकरच विवाह करणार आहेत.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN