'बीसीसीआय'नं डे-नाईट कसोटीसाठी मागवले ७२ गुलाबी चेंडू

Mumbailive

Mumbailive

Author 2019-11-25 18:54:34

img

बातम्या ऐकण्यासाठी बटण दाबा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेबर रोजी होणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार असून, भारत आणि बांगलादेश या दोनही संघांचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. तसंच, या 'डे-नाइट' कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयनं ६ डझन (७२) 'एसजी' गुलाबी चेंडूंची ऑर्डर दिली आहे. 'बीसीसीआय'चे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनीही एसजी कंपनीचे चेंडू या कसोटीसाठी वापरण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दर्जेदार चेंडू

गुलाबी चेंडु वापरण्यात येणार असल्याची माहिती शेवटच्या क्षणी कळाल्यानं 'एसजी' चेंडू उत्पादकांना वेगानं तयारी करावी लागणार आहे. 'एसजी'च्या चेंडूंच्या बाबतीत भारतीय कर्णधार विराटनं समाधानी नसल्याची भावना व्यक्त केली होती, त्यामुळं 'एसजी'समोर कमी वेळेत आणि दर्जेदार चेंडू तयार करण्याचं आव्हान उभं राहिलं आहे.

'एसजी'च्या चेंडूचा वापर

'एसजी'समोर हे गुलाबी चेंडू बनविणे हे आव्हान असेल. कारण स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये अद्याप या 'एसजी'च्या चेंडूचा वापर केला गेलेला नाही. दुलीप ट्रॉफीमध्ये कुकाबुरा ब्रँडचा चेंडू वापर केला गेला होता. गेले तीन हंगाम गुलाबी चेंडू वापरल्यानंतर आता पुन्हा दुलीप ट्रॉफीसाठी लाल चेंडूचा वापर करण्यात येणार आहे.

७२ गुलाबी चेंडू

'बीसीसीआय'नं 'एसजी'कडून ७२ गुलाबी चेंडू मागविले असून, पुढील आठवड्यात ते चेंडू तयार करून मिळणार आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 'एसजी'चे चेंडू वापरले गेले होते. त्याचा चांगले परिणामही पाहायला मिळाले. गुलाबी चेंडूच्या निर्मितीतही त्यांनी तसेच संशोधन केलं आहे. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराटनं ड्युक्सच्या इंग्लंडमध्ये वापरण्यात आलेल्या चेंडूच्या तुलनेत 'एसजी'चे चेंडू चांगले नसल्याची टिपणी केली होती.

हेही वाचा -

यंदाच्या दिवाळीत प्रदूषणात घट

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाला बोनस

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD