'रोहित हिट है भाई!'; हिटमॅनच्या खेळीवर हरभजन फिदा

Loksatta

Loksatta

Author 2019-10-02 21:30:01

img

लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय कसोटी संघात सलामीवीराची भूमिका बजावणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं. मयांक अग्रवालच्या साथीने भारतीय डावाची सुरुवात करताना रोहित शर्माने शतकी खेळीची नोंद केली. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहितचं हे पहिलं तर एकूण कसोटी कारकिर्दीतलं चौथं शतक ठरलं. याचसोबत एकदिवसीय, टी २० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.

Video : रोहितचे दोन सिक्स की अ‍ॅक्शन रिप्ले… तुम्हीही पडाल बुचकळ्यात

रोहितच्या या खेळीने साऱ्यांनाच भुरळ पाडली. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानेही रोहितची स्तुती केली. “व्वा! झकास शतक. जर्सीचा रंग निळा असो किंवा पांढरा, काही फरक पडत नाही. रोहित हिट है भाई”, असे ट्विट करत हरभजनने रोहित शर्मावर स्तुतिसुमने उधळली.

दरम्यान, विशाखापट्टणमच्या मैदानात रोहितने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहितने १५४ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने आपलं शतक पूर्ण केलं. मयांक अग्रवालनेही त्याला दुसऱ्या बाजूने उत्तम साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सत्रातील सुरुवातीचा अर्धा तास संयमी खेळ केला. यानंतर खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघांनीही आपल्या ठेवणीतले फटके खेळत आफ्रिकन गोलंदाजांना पुरतं बेजार केलं. भारताची ही जोडी फोडण्यासाठी आफ्रिकन कर्णधार फाफ डू प्लेसिसने बरेच प्रयत्न केले, मात्र भारतीय फलंदाजांनी त्यांना दाद दिली नाही.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN