'साला मत बोलो यार, रोहित शर्माचे पत्रकाराला उत्तर

Pudhari

Pudhari

Author 2019-10-22 15:31:16

img

रांची : पुढारी ऑनलाईन

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा पत्रकारांशी बोलत असताना अनेकदा मजेशिर उत्तरं देत असतो. आताही त्याने पत्रकाराच्या एका प्रश्नावर दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसऱा कसोटी सामना एक डाव आणि २०२ धावांनी जिंकला. यासह भारतानं मालिकेत आफ्रिकेला व्हाईटवॉश दिला. भारताने पहिला डाव ४९७ धावांवर घोषित केला होता. यामध्ये हिटमॅन रोहित शर्माने द्विशतक तर अजिंक्य रहाणेने शतक केले. भारताने पहिला डाव घोषित केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित शर्माने दिलेल्या एका उत्तराची सध्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

रोहित शर्माशी बोलताना झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एका पत्रकाराने अजिंक्य रहाणेसंदर्भात बोलताना अपशब्द वापरला. अजिंक्यच्या फलंदाजीबद्दल तू काय सांगशील. ज्यावेळी ३०० धावांवर ३ गडी बाद झालेले असतात तेव्हा बाद होतो आणि ४० वर ३ बाद असतात तर साला चाबूक बॅटिंग करतो? असे विचारला असता रोहितने पत्रकाराला चांगलेच उत्तर दिले.

पत्रकाराच्या या प्रश्नावर प्रतिक्रीया देत रोहितने अज्जू को साला मत कहो यार असे सांगितले. त्यांनतर त्याने अजिंक्यवर कौतुकाचा वर्षाव केला. अजिंक्यने आतापर्यंत अनेक जबरदस्त खेळी केल्या आहेत आणि संघाला विजय मिळवून दिले आहेत. कठीण काळात तो किती संयमानं खेळतो हे दाखवून दिले आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD