'हार्दीक पांड्या, डॉक्टरांनी तुझा मेंदूही ठीक केला असेल'

Indian News

Indian News

Author 2019-10-07 11:44:00

img

मुंबई, 07 ऑक्टोबर : सध्या भारताचे दोन क्रिकेटपटू दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्या या दोघांनाही पाठदुखीमुळं क्रिकेटपासून दूर रहावं लागत आहे. दरम्यान, हार्दीक पांड्यावर यशस्वी सर्जरी झाली आहे. याची माहिती दोन दिवसांपूर्वी पांड्याने इन्स्टाग्रामवरून दिली होती

इंग्लंडमध्ये पांड्यावर सर्जरी झाली. त्याने फोटो शेअर करताना म्हटले की, "सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी आभार. मी लवकरच कमबॅक करेन", असे लिहिले आहे. गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या आशियाई कप दरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. मात्र त्यानंतरही पांड्यानं आयपीएल, वर्ल्ड कप आणि दक्षिण आफ्रिका दौरा खेळला होता.

मात्र कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती.

पांड्याने फोटो शेअर केल्यानंतर भारताचा क्रिकेटपटू केएल राहुलनं त्याची फिरकी घेतली आहे. केएल राहुलने म्हटलं की, भावा लवकर बरा हो. आशा आहे की त्यांनी तुझा मेंदूही ठीक केला असेल. भेटू लवकरच.

सर्जरीनंतर पांड्या काही काळ मैदानापासून लांब राहणार आहे. बांगलादेश विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी पांड्या मैदानात उतरणार नाही. बांगलादेश विरोधात 3 नोव्हेंबरपासून मालिका सुरू होणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर पांड्याला विश्रांती दिली होती. त्यामुळं आयपीएल 2020आधी पांड्या मैदानावर दिसू शकतो.

25 वर्षांच्या पांड्यानं 11 कसोटी सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. यात 532 धावा केल्या आहेत. तर 54 एकदिवसीय सामन्यात 937 धावा केल्या आहेत तर 54 विकेट घेतल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 सामन्यात 310 धावा आणि 38 विकेट घेतल्या आहेत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD