अंधांच्या स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर

Indian News

Indian News

Author 2019-11-05 11:20:55

img

पुणे: महाराष्ट्र अंध क्रिकेट संघटनेतर्फे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर करण्यात आला. 11 आणि 12 नोव्हेंबर 2019 रोजी हा संघ पश्‍चिम बंगाल, झारखंड, तामिळनाडू विरुद्ध महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. हे सामने डेक्कन जिमखाना व पीवायसी मैदानावर हे सामने घेण्यात येणार आहेत. त्यानंतर 21 ते 23 नोव्हेंबर 2019 रोजी हा संघ आंध्र प्रदेश आणि केरळशी कोची येथे खेळेल.

एन. एस. वाडिया मैदान येथे महाराष्ट्रच्या अंध क्रिकेट संघनिवड शिबिर आयोजित केले होते. नागेश ट्रॉफी स्पर्धेसाठी जी रणजी सामन्यांच्या धर्तीवर खेळण्यात येणार आहे, त्यासाठी या शिबिरातून 17 खेळाडूंची निवड करण्यात आली.

या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातून 40 खेळाडू सहभागी झाले होते. खेळाडूंची अनुक्रमे बी 1, बी 2 आणि बी 3 श्रेणीत निवडकेली गेली.

संघांत निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :
बी 1 श्रेणी - अक्षय चौधरी, विकास खिल्लारे, मनीष जाधव, अमोल खर्चे, दासाराम राणे, पवन राऊत बी 2 श्रेणी - प्रवीण करलुके, उमेश जाधव, संदीप जाधव, दिलीप मुंडे, अभिजित शिरतोडे बी 3 श्रेणी - अनिल बेलसरे, राहुल महाले, संजय इजागे, हनुमंत कुडले. सरदार वाघ, योगेश घायवट

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD