अखेर बाबर आझमने करुन दाखवलं ! विराट कोहलीला दिला धोबीपछाड

Loksatta

Loksatta

Author 2019-10-01 19:58:27

img

मोठ्या कालावधीनंतर घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध क्रिकेट खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने आश्वासक सुरुवात केली आहे. कराचीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर ६७ धावांनी मात केली. बाबर आझमच्या शतकी खेळाच्या जोरावर पाकिस्तानने ३०५ धावांचा पल्ला गाठला. बाबरने संयमी खेळी करत १०५ चेंडूत ११५ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. यानंतर उस्मान शिनवारीने श्रीलंकेचा निम्मा संघ गारद करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रीलंकेचा संघ २३८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. या खेळीदरम्यान बाबर आझमने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे.

श्रीलंकेविरुद्ध झळकावलेलं शतक हे बाबर आझमचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं ११ वं शतकं ठरलं आहे. सर्वात कमी डावांमध्ये ११ शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला धोबीपछाड देत बाबर आझम तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

  • हाशिम आमला – दक्षिण आफ्रिका – (६४ डावांत ११ शतकं)
  • क्विंटन डी-कॉक – दक्षिण आफ्रिका – (६५ डावांत ११ शतकं)
  • बाबर आझम – पाकिस्तान – (७१ डावांत ११ शतकं)*
  • विराट कोहली – भारत – (८२ डावांत ११ शतकं)
  • शिखर धवन/डेव्हिड वॉर्नर – भारत/ऑस्ट्रेलिया – (८६ डावांत ११ शतकं)
  • अ‍ॅरोन फिंच – ऑस्ट्रेलिया – (८८ डावांत ११ शतकं)

या खेळीदरम्यान बाबर आझम पाकिस्तानचा एका वर्षात सर्वात जलद १ हजार धावा काढणारा फलंदाजही ठरला आहे. बाबरने माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांचा विक्रम मोडीत काढला आहे. २०१९ या वर्षांत बाबरने केवळ १९ डावांमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मियांदाद यांनी १९८७ साली २१ डावांमध्ये अशी कामगिरी करुन दाखवली होती. आतापर्यंत बाबर आझमच्या नावावर २ शतकं तर ७ अर्धशतकं जमा आहेत.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN