अखेर सर्फराज अहमदची कर्णधारपदावरून हकालपट्टी

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-02-01 16:33:21

img

इस्लामाबाद : पाकिस्तानने कर्णधार सर्फराज अहमदची कसोटी आणि ट्वेंटी20 क्रिकेटमधून कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आहे. पाकिस्तानला नुकतेच मायदेशात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. 

या संपूर्ण वर्षात पाकिस्तानला फक्त आणि फक्त पराभव स्वीकारावा लागला आहे. वर्षाच्या सुरवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळाला होता. त्यानंतर एकदिवसीय आणि ट्वेंटी20 मालिकाही त्यांना गमवावी लागली होती. त्यानंरत पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून 5-0 असा मानहानिकार मालिका पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत सर्फराजला विश्रांती देण्यात आली होती. 

img

त्यानंतर विश्वकरंडकातही पाकिस्तानला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांना लीग स्टेजमधून बाहेर पडावे लागले होते. संपूर्ण मालिकेत ना त्यांची गोलंदाजी चमकली ना फलंदाजी आणि सर्फराजने स्वत:ही चांगली कामगिरी केली नाही. याहून वाईट म्हणजे विश्वकरंडकात त्याला आपण जांभई देताना पाहिले होते. त्यानंर त्याचा तंदुरुस्तीच्याही अनेक तक्रारी निघाल्या. 

पंत सावध रहा; धोनीचा खरा वारसदार बांगलादेशविरुद्ध करणार एण्ट्री

विश्वकरंडकानंतर त्याची हकालपट्टी जणू निश्चितच होती. त्याला अखेर आज योग मिळाला. त्याच्या जागी कसोटीमध्ये अजहर अली आणि ट्वेंटी20मध्ये बाबर आझमला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN