अजिंक्यने ठोकले ११वे शतक; गांगुली-लक्ष्मणला टाकले मागे

Pudhari

Pudhari

Author 2019-10-20 16:53:26

img

रांची: पुढारी ऑनलाईन

रांची येथे सुरू असणाऱ्या दक्षिण अफ्रिकेविरूद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक ठोकले. पहिल्या दिवशी रोहित शर्माने शतकी खेळी केल्यानंतर, त्याचा साथीदार अजिंक्य रहाणेनेही आपले शतक फटकावले. विशेष म्हणजे, तब्बल ३ वर्षे आणि १६ कसोटी सामन्यांनंतर अजिंक्य रहाणेने घरच्या मैदानावर खेळताना शतक ठोकले आहे.

अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करून सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यासारख्या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्य दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

तब्बल ३ वर्षानंतर अजिंक्यने ठोकले शतक

आयसीसी टेस्ट रॅकिंकच्या टॉप १० मध्ये असणाऱ्या अजिंक्य रहाणेने शेवटचे कसोटी शतक २०१६ मध्ये ठोकले होते. २०१६ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध इंदौर येथील होळकर मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात रहाणेने १८८ धावांची खेळी केली होती. त्याचे हे शतक भारताच्या मैदानावरील आणि त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक हेाते.

अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे तिसरे कसोटी शतक पूर्ण केले आहे. रहाणेने न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत २-२ शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध त्याला अद्याप शतकी खेळी साकारता आली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे हे त्याचे तिसरे शतक आहे.

कसोटीत पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय फलंदाज

मोहम्मद अझरुद्दीन – १६ शतक

अजिंक्य रहाणे – ८ शतक

पॉली उम्रीगर – ८ शतक

सौरव गांगुली – ६ शतक

व्ही.व्ही.एस.लक्ष्मण – ६ शतक

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD