अजिंक्य रहाणेच्या घरी 'लक्ष्मी'चे आगमन

Indian News

Indian News

Author 2019-10-06 11:52:05

img

मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे बाबा (Ajinkya Rahane becomes father) झाला आहे. अंजिक्य रहाणेची पत्नी राधिकाने (Radhika Dhopavkar) एका गोंडस मुलीला जन्म (Ajinkya Rahane becomes father) दिला आहे. टीम इंडियाचा गोलंदाज हरभजन सिंह याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

"अजिंक्य, बाबा झाल्याबद्दल तुझे अभिनंदन, तुझी परी आणि तिची आई या दोघीही सुखरुप असतील अशी मी आशा करतो. तुझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आता सुरु झाले आहेत," असे ट्विट हरभजनने (Harbhajan Singh Tweet) केले आहेत. त्याच्या या ट्विटनंतर अनेकांनी अजिंक्य आणि राधिकावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

देशभरात सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. ऐन नवरात्रोत्सवात अंजिक्य राहणेच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. अशा अनेक कमेंट हरभजनच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

अजिंक्य सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे कसोटी सामना खेळत आहे. या दौऱ्यापूर्वी अजिंक्यने तो बाबा होणार असल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली होती. त्यावेळी अजिंक्यने राधिकाच्या डोहाळे जेवणाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या या फोटोवर अनेक लाईक्स आणि कमेंट मिळाल्या होत्या.

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. ते दोघेही एकमेकांचे शेजारी होते. बालपणी एकमेकांचे शेजारी असलेल्या या दोघांमध्ये पुढे घट्ट मैत्री झाली. याच मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले.

अजिंक्य आणि राधिकाची मैत्री दोघांच्या घरच्यांनाही माहिती होती. दोघांमध्ये जेव्हा प्रेमसंबंध जुळले तेव्हा ते जास्त काळ लपून राहिले नाही. कुटुंबीयांनीही मग जास्त वेळ न घेता, दोघांचे हात पिवळे करुन टाकले. सप्टेंबर 2014 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN