अजिंक्य रहाणे झाला बापमाणूस, हरभजनने केलं अभिनंदन

Indian News

Indian News

Author 2019-10-05 13:46:00

img

मुंबई, 05 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने मुलीला जन्म दिला आहे. अजिंक्यला कन्यारत्न झाल्याची आनंदाची बातमी भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगने ट्विटरवरून दिली आहे. अजिंक्य रहाणे सध्या विशाखापट्टणन इथं आहे.

अजिंक्य रहाणे आणि राधिका लहानपणापासून मित्र होते. त्यांनी 26 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत लग्न केलं होतं. अजिंक्य रहाणेनं आपण बाप होणार असल्याची गुड न्यूज जुन महिन्यात दिली होती. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअऱ केले होते.

मुलीचा बाप होणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत आता अजिंक्य रहाणेच्या नावाची भर पडली आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN