अफगाण क्रिकेट संचालकपदी अँडी मोलेस

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-05 04:41:00

img

वृत्तसंस्था / काबूल

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू तसेच माजी क्रिकेट प्रशिक्षक 58 वर्षी अँडी मोलेस याची अफगाण क्रिकेट संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा अफगाण क्रिकेट मंडळाने केली आहे.

अँडी मोलेस यांना क्रिकेट क्षेत्रातील मोठा अनुभव असून त्याचा लाभ अफगाणच्या क्रिकेटपटूंना भविष्यकाळात निश्चित होईल. या हेतूने अफगाण क्रिकेट मंडळाने त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे. इंग्लंडमध्ये इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत मोलेस यांनी वॉर्विकशायर आणि ग्रीकलँड वेस्ट या संघाकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अनेक सामने खेळले आहेत. अँडी मोलेस यांच्याकडे क्रिकेट संचालकपदाच्या जबाबदारीसह प्रमुख निवड समिती हे पदही देण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ात दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीवीर लान्स क्लुस्नर याची अफगाण संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN