अफगाण संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी क्लुसनर

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-28 02:01:00

img

वृत्तसंस्था/ दुबई

द. आफ्रिकेचे माजी अष्टपैलू लान्स क्लुसनर यांची शुक्रवारी अफगाण क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्तीची घोषणा केली आहे. अफगाण क्रिकेट मंडळाने विंडीजच्या फिल सिमॉन्स यांची प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी केली होती.

इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाण संघाची निराशजनक कामगिरी झाली होती. या स्पर्धेत अफगाणला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. अफगाण क्रिकेट मंडळाने संघाचा दर्जा सुधारण्यासाठी काही महत्वाचे बदल केले आहेत. आता सिमॉन्सच्या जागी क्लुसनर यांची नियुक्ती केली आहे. सिमॉन्स आणि अफगाण क्रिकेट मंडळ यांच्यात 18 महिन्यांचा करा मार्गदर्शन अफगाण संघाला मोलाचे ठरेल, अशी आशा अफगाण क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN