अल अमिन, अराफत यांचे बांगलादेश संघात पुनरागमन

Loksatta

Loksatta

Author 2019-10-18 04:13:00

img

ढाका : वेगवान गोलंदाज अल अमिन हुसैन आणि डावखुरा फिरकीपटू अराफत सन्नी यांचे बांगलादेशच्या संघात पुनरागमन झाले आहे. गुरुवारी भारताविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी बांगलादेशचा १५ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला.

उभय संघांतील तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून अनुक्रमे दिल्ली, राजकोट आणि नागपूर येथे सामने रंगणार आहे. त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिकाही होणार आहे.

बांगलादेशचा संघ

शकिब अल हसन (कर्णधार), तमिम इक्बाल, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुशफिकूर रहिम, महमदुल्ला रियाद, अफिफ हुसैन, मोसद्देक हुसैन, अल अमिन हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफत सन्नी, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजूर रहमान, शफिऊल इस्लाम.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN