अश्विनकडे पंजाब संघाचे नेतृत्व कायम

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-16 04:58:00

img

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गेल्या दोन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व रविचंद्रन अश्विनकडे सोपविण्यात आले होते. आता 2020 च्या आयपीएल स्पर्धेसाठी पंजाब संघाच्या कर्णधारपदी पुन्हा अश्विनच राहील, असे या संघाचे सह मालक नेस वाडिया यांनी सांगितले.

अलिकडेच किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची नियुक्ती करण्यात आली होती. 2020 च्या आयपीएल स्पर्धेसाठी पंजाब संघाचे नेतृत्व अश्विनकडेच ठेवावे असे मत कुंबळेने व्यक्त केले. 2008 च्या आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने उपांत्य फेरी गाठली होती. 2017 साली चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर कुंबळेने भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाचा स्वखुषीने राजीनामा दिला होता. कर्णधार कोहली आणि कुंबळे यांच्यातील मतभेद तीव्र झाल्याने कुंबळेने स्वत:हून प्रशिक्षकपद सोडले होते. आयपीएल स्पर्धेत कुंबळेने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेंजर्स बेंगळूर संघाचे मेंटर म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD