अष्टपैलू मिचेल मार्शच्या हाताला दुखापत

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-16 04:45:00

img

वृत्तसंस्था/ सिडनी

येथे सुरू असलेल्या शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावेळी लवकर बाद झाल्याने निराश झालेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श ड्रेसिंग रूममधील भितीवर हाताने ठोशे मारल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्याला किमान सहा आठवडे क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागेल.

रविवारी पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया यांच्यातील सामन्यात शेवटच्या दिवशी पश्चिम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श 53 धावांवर बाद झाल्याने हा सामना अनिर्णित राहिला. 27 वर्षीय मार्शच्या उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्याला किमान दीड महिना विश्रांती घ्यावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 21 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असून या मालिकेवेळी कदाचीत मिचेल मार्श पूर्ण तंदुरूस्त राहील, अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलिया व्यक्त केली आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD