आयपीएलचा रोमांच वाढविण्यासाठी ‘पॉवर प्लेअर’ची योजना

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-05 05:24:00

img

योजना षटकानंतर किंवा गडी बाद झाल्यानंतर खेळाडू बदलण्याची मुभा मिळणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंडियन प्रिमियर लीगची सुरुवात करून टी-20 क्रिकेटमध्ये क्रांती आणणाऱया बीसीसीआयने त्यात आता आणखी एक नवा बदल आणण्याचा विचार सुरू केला आहे. पुढील आवृत्तीपासून गेमचेंजर ठरणारी ‘पॉवर प्लेअर’ ही संकल्पना आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

या संकल्पनेनुसार कोणत्याही संघाला सामन्याच्या कोणत्याही क्षणी षटक संपल्यानंतर किंवा गडी बाद झाल्यानंतर एखादा खेळाडू बदलण्याची मुभा मिळणार आहे. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱयाने या संदर्भात सांगितले की, ‘या संकल्पनेला याआधीच मंजुरी मिळाली असून आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा केली जाणार आहे. मंगळवारी ही बैठक मुंबईतील मुख्यालयात होणार आहे.’

‘संघांना आता अंतिम अकरा खेळाडू निवडण्याची गरज लागणार नाही, अशी आमची ही योजना आहे.. यानुसार प्रत्येक संघाला 15 खेळाडू निवडावे लागतील आणि गडी बाद झाल्यानंतर किंवा षटक पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी कोणताही खेळाडू बदलता येणार आहे. ही संकल्पना आम्ही आगामी आयपीएलपासून सुरू करण्याचा विचार करीत आहोत. पण त्याआधी मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याची चाचणी घेऊन पाहणार आहोत,’ असे या अधिकाऱयाने सांगितले.

गेमचेंजर ठरणारी ही संकल्पना सामन्याला पूर्णपणे कलाटणी देणारी ठरणारी असल्याने प्रत्येक संघाला यासाठी चाकोरीबाहेर जाऊन विचार करणे आणि डावपेच आखणे भाग पडणार आहे. शिवाय चाहत्यांनाही यात सामील करून घेता येणार आहे, असे हा अधिकारी म्हणाला. याच्या स्पष्टीकरणार्थ त्यांनी उदाहरण दिले की, ‘समजा शेवटच्या 6 चेंडूत 20 धावांची गरज आहे आणि आंदे रसेल अंतिम 11 मध्ये नसल्याने राखीव खेळाडूंत बसला आहे. पण या नियमामुळे आता तो मैदानात जाऊन फलंदाजी करून शकतो आणि स्फोटक फटकेबाजी करून संघाला विजयही मिळवून देऊ शकतो.’ त्याचप्रमाणे शेवटच्या षटकात प्रतिस्पर्धी संघाला 6 धावा घेण्यापासून रोखावयाचे असताना बुमराहसारखा अव्वल गोलंदाज डगआऊटमध्ये असेल तर हे षटक टाकण्यासाठी कर्णधार त्याला गोलंदाजी देऊ शकतो. यावरून लक्षात येईल की, ही संकल्पना सामन्याला कलाटणी देऊ शकणारी आहे.’ मंगळवारी आयपीएल जीसीच्या बैठकीत यासह अन्य विषयावरही चर्चा होणार आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD