आयपीएलमध्ये होणार पॉवर प्लेअरचा प्रयोग

Indian News

Indian News

Author 2019-11-05 10:10:25

img

मुंबई: जागतिक क्रिकेटमध्ये सातत्याने बदल होत आहेत. क्रिकेटचे चेंडू व त्याचा रंग, नियम तसेच दिवस-रात्र कसोटी असे अनेक बदल आपण पाहतो, आता प्रायोगिक पातळीवर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पॉवर प्लेअर ही नवीन संकल्पना येत आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) ही संकल्पना सुरू करण्यापूर्वी सईद मुश्‍ताक अली स्पर्धेतही त्याचा प्रयोग होणार आहे. मुश्‍ताक अली स्पर्धेत तसेच आयपीएलमधील सामन्यासाठी दोन्ही संघांना आपले 11 नव्हे तर 15 खेळाडू जाहीर करावे लागणार आहेत.

सामन्यातील बाका प्रसंगी दोन्ही संघांना गडी बाद झाल्यानंतर किंवा विशेष स्थितीत एखाद्या खेळाडूऐवजी बदली खेळाडू मैदानात उतरवता येणार आहे.

यालाच पॉवर प्लेअर असे संबोधले जाते. जागतिक क्रिकेटमध्ये ही संकल्पना प्रथमच ते देखील भारतात राबविण्यात येणार आहे. 2020 साली होणाऱ्या आयपीएलच्या मोसमात ही संकल्पना राबविण्यात येण्याचे निश्‍चित असून यात जर यश मिळाले तर कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील याच्या वापराचा विचार
होऊ शकेल.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD