आयपीएलला चेन्नईकडून खेळणार

Deshdoot

Deshdoot

Author 2019-10-06 02:26:00

img

नवी दिल्ली । हरभजन सिंग हा लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार, असे अंदाज गेले काही दिवस क्रिकेट वर्तुळात वर्तवण्यात येत आहेत. पण मी निवृत्ती अजिबात स्वीकारणार नाही. इतकेच नव्हे तर मी पुढच्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळणारही आहे, असे हरभजनने स्पष्ट केले.

20 ऑक्टोबरपासून इंग्लंडमध्ये आयपीएलच्या धर्तीवर ‘द हंड्रे़ड’ नावाची एक क्रिकेट लीग स्पर्धा सुरू होणार आहे. त्यात निवड झालेल्या 25 परदेशी खेळाडूंमध्ये हरभजनचा समावेश आहे. त्यामुळे हरभजन निवृत्त होणार अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

बीसीसीआयच्या नियमानुसार एखाद्या भारतीय खेळाडूला परदेशातील क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये खेळायचे असेल, तर त्यासाठी आधी निवृत्ती जाहीर करावी लागते. त्यामुळेच या चर्चांना उधाण आले. पण हरभजनने मात्र ही शक्यता फेटाळून लावली.

मी बीसीसीआयच्या नियमांचा आदर करतो. आयपीएलमधील माझा सहभाग टिकवून ठेवण्यासाठी मला ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याची मला कल्पना नव्हती. मला ही बाब आताच समजली आहे. मी अजिबात निवृत्त होणार नाहीये. मला जर कोणी आयपीएल आणि ‘द हंड्रेड’ या दोन स्पर्धांमध्ये निवड करायला सांगितले तर मी नक्कीच आयपीएलची निवड करेन. मी लवकरच ‘द हंड्रेड’मधील माझे नाव आणि सहभाग काढून घेईन.
हरभजन सिंग

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN