आयसीसीच्या बैठकीच्या ठिकाणात बदल

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-30 04:52:00

img

वृत्तसंस्था/ मुंबई

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाची (आयसीसी) बैठक ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये आयोजित केली होती. पण आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले असून आता ही बैठक दुबईमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांची प्रकृती सध्या नादुरुस्त असून आपणाला डॉक्टरांनी दीर्घ पल्ल्याचा प्रवास करण्यास मनाई केली आहे. या कारणास्तव ही बैठक सिडनी ऐवजी दुबईत भरविली जाणार आहे. यापूर्वी या बैठकीची तारीख 4 ऑक्टोबर अशी घोषित केली होती. पण आता ही बैठक एक आठवडय़ाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD