आयसीसीने या दोन संघांना दिली मोठी खूशखबर!

Indian News

Indian News

Author 2019-10-15 16:15:35

img

आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी दुबईत पार पडलेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये आयसीसीने झिम्बाब्वे आणि नेपाळ या देशांचा पुन्हा एकदा आयसीसीचे सदस्य म्हणून समावेश करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

झिम्बाब्वेवर बोर्डाच्या कामकाजामध्ये सरकारी हस्तक्षेप झाल्याने आयसीसीने जूलैमध्ये बंदी घातली होती. पण आता ही बंदी आयसीसीने उठवली आहे.

याबद्दल आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर म्हणाले, 'झिम्बाब्वेमध्ये क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या वनचबद्धतेबद्दल मी झिम्बाब्वेच्या क्रीडामंत्र्यांचे आभार मानतो. झिम्बाब्वे क्रिकेटच्या समर्थनार्थ काम करण्याची त्यांची इच्छा स्पष्ट आहे आणि त्यांनी आयसीसीच्या अटींचे पालन केले आहे.

झिम्बाब्वे क्रिकेटला निधी देणे नियंत्रित आधारावर सुरू राहील.'

या निर्णयामुळे झिम्बाब्वे जानेवारीमध्ये होणाऱ्या आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषकात तसेच 2020मध्ये होणाऱ्या आयसीसी सुपर लीगमध्ये सहभागी होऊ शकणार आहे.

झिम्बाब्वे बरोबरच नेपाळचाही आयसीसीचा सदस्य म्हणून सशर्त आधारावर पुन्हा समावेश करण्यात आला आहे. त्यांना 2016 मध्ये निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावरही बोर्डाच्या कामकाजामध्ये सरकारी हस्तक्षेप झाल्याने बंदी घालण्यात आली होती.

नेपाळ क्रिकेट असोसिएशनसाठी 17 सदस्ययी केंद्रीय कार्यकारी समितीच्या निवडणूका या महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण झाल्या. त्यामुळे त्यांच्या क्रिकेटमधील पुनरागमनाचा देखील मार्ग मोकळा झाला.

याबद्दल मनोहर म्हणाले, 'नेपाळमध्ये झालेली प्रगती पाहता आता सहयोगी सदस्यतेच्या निकषांच्या आधारे नेपाळ क्रिकेट असोसिएशनसाठी एक संक्रमण योजना तयार केली जाईल. यामध्ये नियंत्रित निधी देखील समाविष्ट असेल.'

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN