इंग्लंडची जेनी गन निवृत्त

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-17 04:44:00

img

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लंडची 33 वर्षीय अष्टपैलू महिला क्रिकेटपटू जेनी गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडची ती सर्वाधिक टी-20 सामने खेळणारी महिला असून 259 सामन्यात तिने इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने तीन विश्वचषक स्पर्धा व पाच ऍशेस मालिका जिंकल्या आहेत.

फक्त चार्लोट एडवर्ड्सने जेनीपेक्षा जास्त म्हणजे 309 सामने खेळले आहेत. जेनीने 2004 मध्ये पदार्पण केले होते. 2009 मध्ये झालेल्या महिलांच्या पहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या इंग्लंड संघाची ती सदस्य होती आणि त्याच वर्षी झालेल्या वनडे विश्वचषक विजेत्या संघाचीही ती सदस्य होती. ईसीबी महिला क्रिकेटच्या व्यवस्थापकीय संचालक क्लेअर कॉनर यांनी जेनी गनच्या योगदानाचे कौतुक करीत तिला मानवंदना दिली. तिने अष्टपैलू खेळ करीत इंग्लंडला अनेक सामने जिंकून दिले आहेत. तिची उणीव नक्कीच जाणवत राहील, अशा भावना  कॉनर यांनी व्यक्त केल्या.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN