इंग्लंडवरील विजयाने न्यूझीलंडची आघाडी

Indian News

Indian News

Author 2019-11-06 10:00:22

img

नेल्सन: कॉलिन डी ग्रॅंडहोमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडचा तिसऱ्या टी-20 सामन्यात 14 धावांनी पराभव केला व मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. इंग्लंडचे 4 फलंदाज केवळ 10 चेंडूंत बाद झाल्याने त्यांच्यावर पराभवाची नामुष्की आली.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ग्रॅंडहोमच्या 55 धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर 180 धावा उभारल्या. ग्रॅंडहोमने 35 चेंडूत 5 चौकार व 3 षटकार फटकावताना 55 धावांची खेळी केली. त्याला मार्टिन गुप्टीलने 33, रॉस टेलरने 27 व जेम्स नशिमने 20 धावा करत चांगली साथ दिली.

डेव्हीड मलान व जेम्स विन्स यांनी इंग्लंडला विजय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले.

मात्र, न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मायकेल सॅंटनरने मोक्‍याच्या क्षणी बळी मिळविले व न्यूझीलंडला विजय प्राप्त करून दिला.

मलानने 55 तर विन्सने 49 धावांची केलेली खेळी इंग्लंडच्या विजयासाठी अपुरी ठरली. ग्रॅंडहोम सामन्याचा मानकरी ठरला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN