इंग्लंड-न्युझीलंडमध्ये वर्ल्डकप फायनलची पुनरावृत्ती

Pudhari

Pudhari

Author 2019-11-10 17:43:43

img

पुढारी ऑनलाईन डेस्क

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलची पुनरावृत्ती आज (दि.१०) ऑकलंडमध्ये झाली. इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यात झालेला वर्ल्डकप सामना टाय झाला होता. त्यानंतर झालेली सुपर ऑव्हरही टाय झाली होती. वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली. त्यानंतर सर्वाधिक बाऊंडरीजच्या आधारे इंग्लंडला विजेता घोषित केले. अशाच घटनेची पुनरावृत्ती आज ऑकलंडमध्ये घडली. इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यातील पाचवा आणि निर्णायक टी-२० सामना टाय झाला.

विश्वविजेत्या इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यात ५ टी- २० सामन्यांची मालिका सुरु होती. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना ऑकलंड येथे खेळवण्यात आला. पण, सामन्यावेळी पावसामुळे व्यत्यय आला त्यामुळे सामना प्रत्येकी ११ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्युझीलंडने मार्टिन गप्टीलच्या ५० आणि कोलिन मुनरोच्या ४६ धावांच्या जोरावर इंग्लंडसमोर १४६ धावांचे लक्ष्य ठेवले. या दोघांनी ८३ धावांची धमाकेदार सलामी दिली.

न्युझीलंडच्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पण, त्यानंतर बेअरस्टो आणि सॅम कुरेनने ६१ धावांची भागिदारी करत डाव सावरत सामन्यात रंगत भरली. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर इंग्लंडला विजयासाठी ५ धावांची गरज असताना ख्रिस जॉर्डनने चौकार मारला आणि वर्ल्डकप फायनलप्रमाणे सामना टाय झाला.

त्यानंतर सामन्याचा निकाल लावण्यासाठी खेळवण्यात आलेल्या सुपर ऑव्हरमध्ये जॉनी बेअरस्टोने ८ आणि मॉर्गनने ९ धावा करत न्युझीलंडसमोर १७ धावांचे आव्हान ठेवले. मात्र न्युझीलंडला एका विकेटच्या मोबदल्यात ८ धावाच करता आल्या. याचबरोबर इंग्लंडने ५ टी-२० सामन्यांची मालिका ३-२ अशी खिशात घातली.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN