इंग्लंड संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी गॅरी कर्स्टन ?

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-28 04:56:00

img

वृत्तसंस्था / लंडन

आयसीसीच्या व़िश्व चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱया विश्व विजेत्या इंग्लंड संघासाठी द. आफ्रिकेचे माजी कसोटीवीर गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती करण्याचा विचार ईसीबीने चालविला आहे.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी इंग्लंड संघाचे पुढील प्रमुख प्रशिक्षक कर्स्टन राहतील, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या विश्वसनीय व्यक्तीकडून सांगण्यात आले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट संघटनेचे संचालक ऍश्ले जाईल्स यानी नव्या प्रशिक्षकपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. पण ही बातमी गुप्त ठेवण्यात आली. येत्या आठवडाभराच्या कालावधीत इंग्लंड संघासाठी नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली जाईल. तथापि इच्छुक प्रशिक्षकांच्या शर्यतीमध्ये गॅरी कर्स्टन यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. यापूर्वी इंग्लंड संघाला ट्रेव्हर बेलीस यांचे मार्गदर्शन लाभले होते. बेलीस यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघाने गेल्या जुलै महिन्यात आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली होती. त्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलिया बरोबरची ऍशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविली. या मालिकेनंतर बेलीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2011 साली आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱया भारतीय संघाला कर्स्टन यांनी तब्बल चार वर्षे मार्गदर्शन केले होते. कसोटी मानांकनात कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली द. आफ्रिकेने पहिले स्थान मिळविले होते.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN