उद्या भारत-बांगलादेश टी-२० लढत नागपुरात

Mahaupdate

Mahaupdate

Author 2019-11-25 15:29:36

imgनागपूर : दोन वर्षांनंतर नागपूरला टी-२० क्रिकेट सामन्याचे यजमानपद मिळाले असून रविवार १० नोव्हेंबरला भारत आणि बांगलादेश यांच्यातील लढत होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने दुसरा सामना जिंकून बरोबरीत आल्यामुळे तिसऱ्या सामन्याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर होणाऱ्या या लढतीत सामना स्टेडियममध्ये बसून पाहण्याचे जुगाड आतापासून सुरू आहे. तर दुसरीकडे स्टेडियमच्या मार्गात असलेल्या खापरी पुलाचे काम सुरू असल्याने जामठा स्टेडियमकडे जाणारा मार्ग 'जाम' होण्याची शक्यता वाढली आहे. या सामन्यासाठी प्रचंड गर्दी होणार असल्याने खबरदारी म्हणून सामना सुरू असताना वर्धा मार्गावर केवळ अत्यंत महत्त्वाचे काम असेल, अशा केवळ अॅम्ब्युलन्ससारख्या वाहनांनाच सोडण्यात येणार आहे.

वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर चारशेहून अधिक वाहतूक पोलिस आणि त्यांना मदतीसाठी वाहतूक स्वयंसेवक ठेवण्यात येणार आहेत.

यापूर्वी झालेल्या एकदिवसीय किवा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यातच यंदा खापरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून सामना सुटल्यानंतर एकाचवेळी सर्व वाहने एकाच दिशेने येऊन वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता नाकारण्यात येत नसल्याने पोलिसांकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.

त्यामुळे आपण या मार्गावर टोईंग व्हॅन, क्रेनही ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) चैतन्य पंडित यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN