उपचारासाठी बुमरा जाणार लंडनला 

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-01 01:07:36

img

मुंबई - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा पाठीच्या दुखापतीवर उपचार घेण्यसाठी लंडनला जाणार आहे. पाठिच्या खालील बाजूस फ्रॅक्‍चर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बुमराला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेस मुकावे लागले आहे. त्यानंतर होणाऱ्या बांगलादेशविरुद्धही तो खेळू शकणार नाही. या दुखापतीवर उपचार करून घेण्यासाठी बुमरा लंडनला जाणार असल्याचे "बीसीसीआय'च्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

बुमरा किमान दोन महिने खेळू शकणार नाही. त्याने लवकर बरे व्हावे यासाठी त्याला परदेशात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्याला लंडनाला पाठविण्यात येणार असून, राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचे फिजिओ आशिष कौशिक त्याच्यासोबत जाणार आहेत. त्याच्या दुखापतीवर तीन त÷ज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असून, त्यासाठी दिवसही निश्‍चित करण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

बुमरा 6 किंवा 7 ऑक्‍टोबररोजी लंडनला जाणार असून, तो आठवडाभर लंडनमध्ये असेल. या तीन तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर त्याच्या उपचाराची निस्चित दिशा ठरविण्यात येणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN