ऋषभला खेळू द्या : रोहित शर्मा

Pudhari

Pudhari

Author 2019-11-10 10:41:53

img

नागपूर : वृत्तसंस्था

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने पुन्हा एकदा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला पाठिंबा देताना त्याला त्याचा खेळ करू द्या, काही काळासाठी त्याच्यावरून लक्ष बाजूला करा, असे आवाहन केले आहे.

खराब फलंदाजी आणि यष्टिरक्षणामुळे पंत सध्या सर्वांच्या टीकेचे लक्ष्य बनला आहे. या पार्श्‍वभूमीवर तिसर्‍या टी-20 सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला, संघ व्यवस्थापनाने आखलेल्या धोरणाप्रमाणे त्याला आणखी संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जास्त चर्चा करू नये. त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करू द्यावा, अशी माझी सर्वांना विनंती आहे.
रोहित म्हणाला, ऋषभ हा फिअरलेस खेळाडू आहे. त्यामुळे त्याला त्याच्या मनाप्रमाणे खेळ करू द्यायचे धोरण आहे. त्याच्यावर सातत्याने होणारी टीका अयोग्य असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय रोवण्यास त्याला वेळ द्यायला हवा.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN