एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल आवश्‍यक

Indian News

Indian News

Author 2019-11-06 10:15:53

img

नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटच्या आराखड्यात मोठ्या बदलाची शक्‍यता असल्याचे मत व्यक्‍त केले आहे. आधुनिक काळात प्रेक्षकांना मैदानाकडे जास्त संख्येने खेचण्यासाठी तसेच महसूलवढीचा विचार केला तर क्रिकेटमध्ये काही बदल करणे आवश्‍यक आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकच डाव 50 षटकांचा आहे, त्याऐवजी दोन डाव प्रत्येकी 25-25 षटकांचे करावेत व या डावांमध्ये 15 मिनिटांची विश्रांती असावी, जेणेकरून एकदिवसीय सामना देखील दोन डावांचा खेळला जावा, असेही सचिनने व्यक्त केले.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सचिन म्हणाला, मी आधीच सांगितले सध्याच्या आराखड्यात काही बदल करावेत तरच येणाऱ्या काळात आधुनिकतेची कास धरता येईल.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवे बदल केल्यास अनेक आव्हानांना सामोरे जाणे सोपे होईल. मैदानावरील धुके किंवा दव हे गोलंदाजी करणाऱ्या संघाची चिंता वाढवणारे असते. पण नव्या बदलांमुळे सामना गमावण्याची वेळ आलेला संघदेखील सामन्यात जोरदार पुनरागमन करू शकेल.

50 षटकांच्या ऐवजी 25 षटकांचे दोन डाव असतील आणि पावसाची शक्‍यता असेल, तर दोन्ही संघांना वेगळी रणनीती बनवता येऊ शकते, असेही सचिनने सांगितले. प्रामाणिकपणे बोलायचे झाले तर आमच्यापैकी कुणालाही डकवर्थ लुईस नियम समजलेला नाही. मला वाटते, फक्‍त त्या दोन डकवर्थ लुईस यांनाच हा नियम समजत असेल. पावसामुळे रद्द झालेला विजय हजारे स्पर्धेतील सामन्याचे उदाहरण घ्या, हा सामना पावसामुळे वाया गेला आणि मुंबईला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. असे होऊ नये तर दोन्ही संघांना समान संधी मिळावी, असेही त्याने व्यक्त केले.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD