एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल शिखर धवनने केले मोठे भाष्य.

Indian News

Indian News

Author 2019-09-29 21:33:54

img

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्याच्याबद्दल अनेक दिग्गजांनी विविध मते मांडली आहेत. काहींनी त्याने निवृत्ती घेण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी त्यानेच कधी निवृत्ती घ्यावी हे ठरवावे, असे म्हटले आहे.

आता धोनीच्याच नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या शिखर धवननेही म्हटले आहे की धोनीने भारतीय क्रिकेटमधील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्याच्या भविष्याचा निर्णयही त्यानेच घ्यायला हवा.

इंडिया टीव्ही चॅनेलवरील 'आप कि आदालत' कार्यक्रमात बोलताना शिखर म्हणाला, 'धोनी अनेक काळापासून खेळत आहे.

मला वाटते त्याला माहित आहे त्याने कधी निवृत्ती घ्यावी. हा निर्णय त्याचाच असावा. त्याने त्याच्या कारकिर्दीत भारतासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतेले आहेत आणि मला खात्री आहे वेळ आली की तो निवृत्तीचा निर्णयही घेईल.'

याबरोबरच शिखर म्हणाला, 'धोनीला प्रत्येक खेळाडूची क्षमता माहिती आहे. खेळाडूला कुठपर्यंत पाठिंबा द्यायचा हे त्याला माहित आहे. त्याला खेळाडूतून चॅम्पियन कसा तयार करायचा हे देखील माहित आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेले यश या गोष्टींना न्याय देते. त्याचे नियंत्रण हेच त्याचे कौशल्य आहे.'

तसेच शिखरने असेही म्हटले की कर्णधार विराटसह संपूर्ण संघ धोनीचा आदर करतो. शिखर म्हणाला, 'धोनी भाई कर्णधार म्हणून यशस्वी झाला आहे. आम्ही सर्व त्याचे आभारी आहोत आणि त्याचा खूप आदर करतो. विराटचेही हेच म्हणणे आहे.'

तसेच शिखरने धोनी आणि विराटमध्ये असणाऱ्या चांगल्या नात्याबद्दलही सांगितले आहे. तो म्हणाला, 'जेव्हा विराट तरुण होता तेव्हा धोनीने त्याला खूप मार्गदर्शन केले आहे. जेव्हा विराट कर्णधार झाला तेव्हाही धोनी भाई नेहमीच त्याला मदत करण्यासाठी तयार होता. हे एक नेतृत्व गुण आहे. विराट धोनीबद्दल जशी कृतज्ञता व्यक्त करतो ते पाहून छान वाटते.'

Related Posts

२०१८-१९ च्या विजेत्या मुंबईला छत्तीसगडचा दे धक्का!

Sep 29, 2019

रोहित शर्माला कसोटीत ओपनिंग करण्याआधी लक्ष्मणने दिला.

Sep 29, 2019

तसेच मागील अनेक दिवसांपासून रिषभ पंतवर होणाऱ्या टिकेबद्दल शिखर म्हणाला, 'रिषभ प्रतिभाशाली आहे आणि मला खात्री आहे तो भारताकडून दिर्घ कारकिर्द घडवेल. तो मेहनत घेत आहे. काहीवेळेस तूम्ही धावा करु शकत नाही, पण त्यातून तूम्ही शिकता. प्रत्येकाबरोबर हे घडते. मला खात्री आहे तो देखील यातून शिकेल.'

'पंत चांगला खेळाडू आहे आणि आपण चांगल्या खेळाडूला पाठिंबा देणे गरजेचे असते. मी पण माझ्या आयुष्यात वाईट परिस्थितीतून जातो. हा खेळाचाच भाग आहे.'

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD