एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल शेन वॉटसन म्हणाला…

Maha Sports

Maha Sports

Author 2019-10-15 09:43:03

img

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्याच्याबद्दल अनेक दिग्गजांनी विविध मते मांडली आहेत.

आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघातील संघसहकारी शेन वॉट्सनने म्हटले आहे की धोनी अजूनही चांगला खेळत आहे. पण निवृत्तीचा निर्णय कधी घ्यायचा हे धोनीनेच ठरवावे.

चेन्नईमधील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना वॉटसन म्हणाला, ‘धोनीकडे अजूनही चांगली क्षमता आहे. तो अजूनही चांगल्या हलचाली करतो आणि एकेरी, दुहेरी धावाही जलद गतीने घेतो, तसेच यष्टीरक्षणही चांगले करतो. पण निर्णय कधी घ्यायचा हे त्याच्यावरच अवलंबून आहे. तो जे काही करेल ते योग्यच असेल. कारण त्याला माहित पुढे काय होणार आहे.’

धोनी 2019 विश्वचषकानंतर क्रिकेटपासून दूर आहे. त्याने त्याचा शेवटचा सामना भारताकडून 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध जूलैमध्ये खेळला आहे.

याबरोबरच वॉटसनने विराट कोहलीच्या नेतृत्वाचेही कौतुक केले आहे. वॉटसन म्हणाला, ‘विराटने भारतीय संघाबरोबर चांगले काम केले आहे. तो सर्व क्रिकेटप्रकारात चांगली कामगिरी करत आहे. तो आत्ता जे काही करत आहे त्याचा फायदाच होत आहे आणि संघही त्याच्या नेतृत्वाला चांगली साथ देत आहे.’

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN