ऑस्ट्रेलियन महिला संघालाही पुरुष संघासमान मानधन

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-16 02:04:00

img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पुरुषांच्या संघाला टी-20 विश्वचषक स्पर्धेत जितके मानधन दिले जाईल, तितकेच मानधन, बक्षीस महिला संघाला देखील दिले जाईल, यासाठी आपण पाठपुरावा करु, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी नमूद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने महिलांच्या स्पर्धेसाठी 2.6 दशलक्ष डॉलर्स बक्षीस रकमेची वाढ जाहीर केली असून उपजेत्यांना 5 लाख दशलक्ष डॉलर्सचे इनाम मिळेल. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी हा बदल केला गेला आहे.

यापूर्वी 2016 मध्ये भारतातच संपन्न झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत जेतेपद संपादन करणाऱया विंडीजला 1.6 दशलक्ष डॉलर्स इतकी कमी रक्कम बक्षीस स्वरुपात प्राप्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, क्रिकेट ऑस्ट्रेलिया इनामात वाढ करण्यासाठी आग्रही राहिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियासह राष्ट्रीय रग्बी लीग, फुटबॉल फेडरेशन ऑस्ट्रेलिया या ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या क्रीडा फेडरेशननी स्त्री-पुरुष समानतेवर सातत्याने भर दिला असून दोन्ही विभागातील जेत्यांना समसमान बक्षीस रक्कम देण्यामागे तोच मुख्य उद्देश आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD