ऑस्ट्रेलियाच्या हिलीचा 100 वा सामना

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-01 04:37:00

img

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू यष्टीरक्षक ऍलीसा हिलीने टी-20 या प्रकारात आपल्या सामन्यांचे शतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारी 29 वर्षीय हिली ही ऑस्ट्रेलियाची दुसरी तर जागतिक महिला क्रिकेटपटूंमधील नववी क्रिकेटपटू आहे. यापूर्वी असा पराक्रम ऑस्ट्रेलियाच्या इलेसी पेरीने केला होता.

क्रिकेटच्या टी-20 प्रकारात आयसीसीतर्फे ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसा हिलीची 2019 च्या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली होती. 2017 पासून आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपासून हिली सर्वाधिक धावा जमविणारी ऑस्ट्रेलियाची पहिली क्रिकेटपटू आहे. यापूर्वी झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत  ऑस्ट्रेलियाच्या हिलीची मालिकावीर म्हणून निवड झाली होती. 2010 च्या फेब्रुवारीमध्ये हिलीने आपल्या वयाच्या 19 व्या वर्षी टी-20 प्रकारात पदार्पण केले होते.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN