ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची विजयी सलामी

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-06 04:37:00

img

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

यजमान ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने श्रीलंका विरूद्धच्या वनडे मालिकेत विजयी सलामी देताना येथे झालेल्या पहिल्या सामन्यात लंकेचा 157 धावांनी दणदणीत पराभव केला. सध्या लंकेचा महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर असून लंकन संघाला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतही यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 3-0 असे एकतर्फी पराभूत केले आहे.

वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार लेनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 8 बाद 281 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेचा डाव 41.3 षटकांत 124 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या डावात मेग लेनिंगने 73, बेथ मुनीने 66 धावा झळकविल्या.

लेनिंग आणि हेन्स या जोडीने 126 धावांची भागीदारी केली. हिली केवळ 8 धावांवर बाद झाली. लंकेतर्फे प्रबोधिनीने 46 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेचा डाव 41.3 षटकांत 124 धावांत आटोपला. शशीकला सिरीवर्धनेने 30 धावा जमविल्या. सी अट्टापटूने 32 चेंडूत 13 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे गार्डर्नर आणि व्हॅलेमेनिक यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया- 50 षटकांत 8 बाद 281, श्रीलंका- 41.3 षटकांत सर्वबाद 124.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN