ऑस्ट्रेलिया संघासाठी हॅरीस, माईक हसी प्रशिक्षक

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-21 05:26:00

img

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याबरोबर होणाऱया आगामी टी-20 मालिकांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माजी कसोटीवीर माईक हसी आणि रेयान हॅरीस यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

ऑस्ट्रेलियात पुढीलवर्षी होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी माईक हसी ऑस्ट्रेलियन संघाचे प्रमुख प्रशिक्षक राहतील. 44 वर्षीय माईक हसीने ऑस्ट्रेलियाचे  38 टी-20 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज रेयान हॅरीसची ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्रॉय कुलेकडे सोपविली होती. आता कुलेच्या जागी हॅरीसची नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका  27 ऑक्टोंबरपासून ऍडलेड येथे सुरू होईल. त्यानंतर पाक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला  3 नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD