कपिल देव यांचा सल्लागार समितीचा राजीनामा

Pudhari

Pudhari

Author 2019-10-02 17:01:00

img

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा ‘लाभाचे पद’ हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. ‘लाभाच्या पदा’च्या मुद्द्यावर कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या क्रिकेट सल्लागार समितीला देखील लक्ष्य करण्यात आले. या सर्व घडमोडीनंतर कपिल देव यांनी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी सदस्या शांत रंगास्वामी यांनी देखील समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर डी. के. जैन यांनी मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर दोघांना यावर नोटिस देत स्पष्टीकरण मागितले होते.

क्रिकेट जगतात सर्वात उत्तम अष्टपैलु खेळाडू राहिलेल्या कपिल देव यांनी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय आणि बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांना मेलद्वारे आपला राजीनामा सोपवला आहे. सल्लागार समितीचा अध्यक्ष असण्याचा मला खुप चांगली संधी मिळाली. विशेष म्हणजे मुख्य प्रशिक्षक निवडीच्या वेळेस खूप चांगला अनुभव आला. मात्र, मी आता तातडीने क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा देत आहे. असे या मेलमध्ये कपिल यांनी म्हटले आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN