कराचीचा वन-डे दुष्काळ पावसाने लांबवला

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-09-28 08:28:24

img

कराची : कराचीतील एकदिवसीय लढतीचा दुष्काळ पावसाने लांबवला आहे. तब्बल दहा वर्षे आठ महिने आणि सहा दिवसांनंतर कराचीत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय लढत होणार होती, पण ती पावसामुळे वाहून गेली. दिवसांच्या भाषेत बोलायचे झाले, तर 3 हजार 901 दिवसांनी होणारी लढत होऊ शकली नाही.

कराचीतील यापूर्वीची लढत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातच झाली होती, त्यात पाकिस्तानने बाजी मारली होती. काही वर्षांपूर्वी श्रीलंका संघ पाकिस्तानात आला होता, त्यावेळी त्यांच्या बसवर हल्ला झाला होता. त्यानंतर झिम्बाब्वेचा संघच केवळ पाकिस्तानात खेळला आहे, पण त्या दौऱ्यास फारसे महत्त्व दिले जात नाही.

दरम्यान, पाकिस्तान सरकारने श्रीलंका दौरा सुरळीत पार पाडण्यासाठी कठोर उपाययोना केल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा मुक्काम असलेले हॉटेल ते स्टेडियम मार्गावर साडेचार हजार पोलिस तैनात होते. एवढेच नव्हे तर कराचीतील नॅशनल स्टेडियम शेजारील प्रत्येक रस्त्यावर लष्कर तैनात होते. अर्थात स्टेडियम परिसरातील दोन प्रमुख रस्ते सामन्याच्या कालावधीत पूर्ण बंद करण्यात आले होते.

प्रत्यक्ष मैदानातील सुरक्षेची पूर्ण जबाबदारी रेंजर्सकडे आहे. मैदानाबाहेरही रेंजर्स आहेत, पण त्यांच्या मदतीला पोलिस आहेत. स्टेडियमच्या पार्किंग ठिकाणी रेंजर्स आहेत. स्टेडियम परिसरातील इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना ओळखपत्रे दाखवूनच प्रवेश दिला जात होता. एवढेच नव्हे तर स्टेडियम परिसरातील प्रत्येक पथदिव्यांची दोन दिवसांपासून सातत्याने तपासणी केली जात आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN