कर्नाटकच्या विजयात पांडे-राहुलची चमक

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-03 05:13:00

img

वृत्तसंस्था/ बेंगळूर

कर्णधार मनीष पांडे व सलामीवीर केएल राहुल यांनी फलंदाजीत चमक दाखविल्यामुळे कर्नाटकाने विजय हजारी करंडक स्पर्धेतील ईलाईट गट अ मधील सामन्यात छत्तीसगडचा 79 धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर कर्नाटकाने राहुलच्या 81 व पांडेच्या नाबाद 142 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर 50 षटकांत 7 बाद 285 धावा जमविल्या. त्यानंतर छत्तीसगडचा डाव 44 षटकांत 206 धावांत गुंडाळून विजय साकार केला. कर्नाटकने देवदत्त पडिक्कल 8 व करुण नायर 1 यांना लवकर गमविल्यानंतर राहुल-पांडे यांनी तिसऱया गडय़ासाठी 150 धावांची भागीदारी करून डाव सावरला आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्याही गाठून दिली. राहुलने 103 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार, एक षटकार मारला. पांडेने 118 चेंडूत 5 चौकार, 7 षटकारांसह नाबाद 142 धावा फटकावल्या. छत्तीसगडच्या पंकज राव व शशांक सिंग यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.

286 धावांचा पाठलाग करताना प्रसिद्ध कृष्णा (3-31) व रोनित मोरे (2-52) यांच्या भेदक माऱयापुढे त्यांची स्थिती 3 बाद 68 अशी झाली. नंतर स्पिनर श्रेयस गोपालने आपल्या फिरकी जाळय़ात अडकवल्यानंतर छत्तीसगडला अखेरपर्यंत सावरताच आले नाही. गोपालने 53 धावांत 3 बळी मिळविले. फक्त अमनदीप खरेने 62 चेंडूत सर्वाधिक 43 धावा जमविल्या.

ईलाईट अ गटातील अन्य सामन्यात सौराष्ट्रने आंध्रवर 153 धावांनी विजय मिळविला तर झारखंडने केरळवर केवळ 5 धावांनी विजय मिळवित 4 गुण मिळविले. हा सामना 36 षटकांचा खेळविण्यात आला होता.

संक्षिप्त धावफलक : कर्नाटक 50 षटकांत 7 बाद 285 (पांडे नाबाद 142, राहुल 81, पंकज राव 2-60) वि. छत्तीसगड 44 षटकांत सर्व बाद 206 (अमनदीप खरे 43, शशांक चंद्रकार 42, एमपी कृष्णा 3-31, गोपाल 3-53, रोनित मोरे 2-52).

सौराष्ट्र : 3 बाद 298 वि.वि. आंध्र सर्वबाद 145.

झारखंड : 36 षटकांत 5 बाद 258 वि.वि. केरळ सर्व बाद 253.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN