कर्नाटक उपांत्य फेरीत दाखल

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-21 05:18:00

img

वृत्तसंस्था/ बेंगळूर

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत के.एल. राहुलच्या शानदार खेळीच्या जोरावर कर्नाटकाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. रविवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकाने पाँडेचेरीचा 8 गडय़ांनी पराभव केला. राहुलने या सामन्यात 90 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

या सामन्यात कर्नाटकाने नाणेफेक जिंकून पाँडेचेरीला प्रथम फलंदाजी दिली. पाँडेचेरीने 50 षटकांत 9 बाद 207 धावा जमविल्या. त्यानंतर कर्नाटकाने 2 बाद 213 धावा जमवित हा सामना 8 गडय़ांनी जिंकला.

पाँडेचेरीच्या डावात मारीमुथूने नाबाद 58 तर सागर त्रिवेदीने 54 धावा जमविल्या. माँडेचेरीची एक वेळ स्थिती 6 बाद 41 अशी केविलवाणी होती. कर्नाटकातर्फे प्रवीणकुमार दुबेने 44 धावांत 3 तर कौशिकने 2 गडी बाद केले. मिथुनने 35 धावांत 2 बळी मिळविले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्नाटकाच्या डावाला दमदार सुरूवात झाली. राहुल आणि पडीकल यांनी सलामीच्या गडय़ासाठी 98 धावांची भागिदारी केली. पडीकलने 50 धावा जमविल्या. के.एल. राहुलने 112 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 90 धावा झळकविल्या. राहुल आणि रोहन कदम यांनी दुसऱया गडय़ासाठी 84 धावांची भागिदारी केली. कदम आणि कर्णधार मनिष पांडे यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. पांडे 20 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक- पाँडेचेरी 50 षटकांत 9 बाद 207 (मारीमुथू नाबाद 58, त्रिवेदी 54, दुबे 3-44, कौशिक आणि मिथुन प्रत्येकी दोन बळी), कर्नाटक- 2 बाद 213 (के. राहुल 90, पडीकल 50, मनिष पांडे नाबाद 20, उदेशी 2-47).

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD