कसोटीमध्येही रोहितचा टी-20 अवतार! झळकवलं शानदार शतक

News18

News18

Author 2019-10-02 13:45:00

img

विशाखापट्टणम, 02 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या सामन्यात सलामीला उतरलेल्या रोहित शर्माचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूपासून लयीत असलेला रोहितनं सलामीचे पहिले शतक पूर्ण केले. रोहितनं 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केले. रोहितचे चौथे शतक आहे. 154 चेंडूत रोहितनं ही कामगिरी केली. या सामन्यात रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी सलामीला फलंदाज केली. दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मानं पहिल्यांदाच सलामीला फलंदाजी केली.

भारताकडून तब्बल 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही सलामीचे फलंदाज पहिल्यांदाच कसोटी सामना खेळत आहे. याआधी 100हून अधिक सामन्यात सलामीला फलंदाजी केलेल्या रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये ही संधी मिळाली नाही. मात्र दक्षिण आफ्रिका विरोधात रोहित चांगल्या लयीत दिसला. या सामन्यात रोहितनं पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपल्या खेळाचा शुभारंभ केला. त्यामुळं टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह कसोटीमध्येही आपले पाय रोवत आहे.

चौका मारत केली खेळीची सुरुवात

एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करणारा रोहित कसोटीमध्येही आपली कमाल दाखवत आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच रोहितनं राबाडाच्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटला चौकार लगावला. त्यामुळं जवळजवळ वर्षानंतर कसोटी खेळणाऱ्या रोहितनं टी-20 एकदिवसीय क्रिकेट पाठोपाठ आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

रोहितवर मोठी जबाबदारी

केएल राहुलच्या खराब फॉर्ममुळं रोहित शर्माला दक्षिण आफ्रिका विरोधात संघा स्थान मिळाले. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये रोहितनं मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. त्यामुळं सलामीला पहिल्यांदाच उतरलेल्या रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

असा आहे भारताचा संघ- विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, ऋद्धिमान साहा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN