कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक नको : डु प्लेसीस

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-28 04:57:00

img

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

भारतात नुकत्याच झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत द. आफ्रिकेला व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले. यजमान भारताने द. आफ्रिकेचा या मालिकेत 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील तिन्ही कसोटीत द. आफ्रिकेने नाणेफेक गमविली होती. नाणेफेकीचा कौल संघाविरूद्ध गेल्याने द. आफ्रिकेला ही मालिका सपशेल गमवावी लागली. दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक बंद करण्याचा विचार व्हावा, अशी सूचना द. आफ्रिकेचा कर्णधार डु प्लेसीसने केली आहे.

भारताचा दौरा संपवून द. आफ्रिकेचा संघ मायदेशी दाखल झाल्यानंतर डु प्लेसीसने आपले हे मत व्यक्त केले.या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्रत्येक पहिल्या डावात त्यानी जवळपास 500 धावांचा टप्पा गाठत डावाची घोषणा केली. भारताच्या भक्कम फलंदाजीमुळे द. आफ्रिकेवर साहजिकच दडपण आले. तशात भारताची गोलंदाजी भेदक झाल्याने द. आफ्रिकेची फलंदाजी साफ कोलमडली. या मालिकेतील प्रत्येक सामन्यात खेळाच्या तिसऱया दिवसापासून द. आफ्रिका संघावर अधिक दडपण जाणवू लागले. दुसऱया देशात कसोटी मालिका खेळताना नाणेफेक रद्द करून पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीची संधी द्यावी असे डु प्लेसीसने म्हटले आहे. अलीकडच्या कालावधीत द. आफ्रिकेची कामगिरी वनडे क्रिकेटमध्ये निराशजनक झाली आहे.  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये द. आफ्रिपेचे आव्हान प्राथमिक फेरीतच समाप्त झाल्यानंतर क्रिकेट द. आफ्रिकेने  प्रशिक्षक वर्गामध्ये तसेच निवड समितीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेच्या संघाची नव्याने पुर्नबांधणी प्रक्रिया चालू आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD