कीटकनाशक फवारणी करताना उपाय योजनेचे दिले धडे

Indian News

Indian News

Author 2019-09-27 20:25:21

img

वर्षा डोंगरे, (पाथरी) - जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने व फवारणी करताना काळजी न घेतल्याने विषबाधा झाल्याने दोन शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याची या खरीप हंगामांमध्ये घटना घडल्या आहेत.

त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये फवारणी संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा पाथरी यांच्या विद्यमाने सोयाबीन, तूर, कापूस, या पिकातील कीड व रोग व्यवस्थापन व तसेच कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भाता प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही .व्ही.दलाल, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एन .के जाधवर, भरतेश वर शेतकरी गट, साई महिला बचत गट बळीराजा शेतकरी गट, बनाई शेतकरी गट या गटातील शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN