कोणालाही न जमलेला विक्रम करण्याची टीम इंडियाला संधी

Loksatta

Loksatta

Author 2019-10-01 16:35:13

img

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशाखापट्टणम येथे होणार आहे. या वर्षातील भारताची मायदेशात ही पहिलीच कसोटी मालिका आहे. भारताने या आधी मायदेशात शेवटची कसोटी मालिका ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती. या मालिकेत भारताने २-० असा विजय मिळवला होता. त्यानंतर थेट वर्षभरानंतर भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसोबतच भारतीय संघाला एका मोठा पराक्रम करण्याची संधी आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध मिळवलेला विजय हा भारताचा मायदेशातील सलग १० वा मालिका विजय होता. त्यामुळे बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत जर भारतीय संघाने विजय मिळवला, तर हा भारताचा मायदेशातील सलग ११ वा कसोटी मालिका विजय असेल. या आधी कोणत्याही संघाला मायदेशात सलग १० पेक्षा अधिक कसोटी मालिका विजय मिळवला आलेले नाही. त्यामुळे भारताला मायदेशात सलग ११ कसोटी मालिका विजय मिळवून नवा पराक्रम करण्याची संधी आहे.

मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका विजय मिळवण्याचा विक्रम भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघाच्या नावावर आहे. दोनही संघांनी १० मालिका विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने दोन वेळा मायदेशात सलग १० कसोटी मालिका विजय मिळवले आहेत. पण त्यांना ११ वा विजय मिळवता आलेला नाही. तो पराक्रम करण्याची भारताकडे संधी आहे.

भारताने फेब्रुवारी २०१३ पासून आत्तापर्यंत मायदेशात सलग १० कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह वॉ आणि मार्क टेलर यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर १९९४ ते नोव्हेंबर २००० दरम्यान पहिल्यांदा सलग १० कसोटी मालिका मायदेशात जिंकल्या होत्या. त्यानंतर रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने जुलै २००४ ते नोव्हेंबर २००८ दरम्यान दुसऱ्यांदा मायदेशात सलग १० कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN