कोहलीचा 'विराट' विक्रम; सचिन, धोनीलाही टाकले मागे

Indian News

Indian News

Author 2019-10-10 22:52:00

img

विराट कोहली कर्णधार म्हणून 50वा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात विराटने नाबाद 63 धावा केल्या. कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिका विरोधात विराटने सर्वात जास्त 600 धावा केल्या आहेत. विराटने तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने कर्णधार म्हणून आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 553 धावा केल्या होत्या. तर, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. धोनीने कसोटीमध्ये कर्णधार म्हणून 461 धावा केल्या आहेत.

आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे कर्णधार -

  • विराट कोहली - 600* धावा
  • सचिन तेंडुलकर - 553 धावा
  • महेंद्रसिंग धोनी - 461 धावा

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN