कोहलीची तहान महागाई मोलाची

Indian News

Indian News

Author 2019-11-07 10:30:09

img

नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तहान भागविण्यासाठी जे पाणी पितो त्याची किंमत ऐकली तरी सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळेल. फ्रान्समधून केवळ कोहलीसाठी या पाण्याची आवक होते.

कोहली काही वर्षांपूर्वी विगन झाला आहे, तसेच त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील विगन आहे. विगन असणारी व्यक्‍ती मांसाहार तसेच दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करत नाहीत.

कोहलीच्या तंदुरुस्तीचा एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पिण्याचे पाणी. कोहली इतरांच्या मनाने जास्त पाणी पितो, इतकेच नव्हे तर ते पाणीदेखील साधेसुधे नसते तर हजारो रुपये किंमत असणारे हे पाणी थेट फ्रान्समधून आयात केले जाते.

कोहली जे पाणी पितो त्याची किंमत आहे 35 हजार रुपये. फ्रान्सच्या ईव्हियान कंपनीचे पाणी पितो. हे पाणी केवळ कोहलीसाठीच आयात केले जाते. या पाण्याची किंमत 600 रुपये लिटर ते 35 हजार रुपये आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN