कोहली, लोकेशच्या क्रमवारीत घसरण

Deshdoot

Deshdoot

Author 2019-09-26 02:21:00

img

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-20 ची क्रमवारी आज जाहीर केली.

दुसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 9 गडी राखत भारतावर मात केली. टी-20 क्रमवारीत विराट कोहली दहाव्या स्थानावरुन अकराव्या स्थानावर घसरला आहे.

इतर भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्माने आपले आठवे स्थान कायम राखले आहे. तर त्याचा सलामीवीर साथीदार चौदाव्या स्थानावरुन तेराव्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी संघातून बाहेर गेलेल्या लोकेश राहुलचीही क्रमवारीत घसरण झाली असून तो दहाव्या स्थानावर घसरला आहे.

भारतीय गोलंदाजांनाही फारशी आश्वासक कामगिरी करता आलेली नाही. गेले काही महिने टी-20 क्रिकेटपासून दूर राहिलेला जसप्रीत बुमराह आपल्या 31 व्या स्थानावर कायम आहे. तर फिरकीपटू कुलदीप यादव तेराव्या स्थानावरुन चौदाव्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा अलेक्स हेल्स आणि भारताचा रोहित शर्मा यांचे 664 समान गुण असल्याने दोघेही आठव्या स्थानावर आहेत. गोलंदाजाच्या क्रमवारीत भारताकडून वॉशिंग्टन सुंदर टॉप गोलंदाज आहे. तो सध्या 50व्या स्थानावर आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN